शिवसेना पक्ष आणि चिन्ह कोणाचे यावर गुहावटी फॅक्टर महत्वपूर्ण…

0

शिवसेना पक्ष आणि चिन्ह कोणाचं यावर सुप्रीम कोर्टात शिवसेना ठाकरे पक्षाकडून जेष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला. सुप्रीम कोर्टात युक्तीवाद करताना कपिल सिब्बल यांनी संपूर्ण घटनाक्रम न्यायालयासमोर मांडला. विधानपरिषदेत क्रॉस वोटिंग झालं त्यानंतर हे आमदार सुरतला गेले, सुरतहून हेच आमदार गुवाहाटीला गेले हा काही योगायोग नव्हता. तेव्हाच उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना विधिमंडळ नेतेपदावरून दूर केलं, असा युक्तीवाद कपिल सिब्बल यांनी न्यायालयात केला आहे.

जेव्हा एकनाथ शिंदे यांना विधिमंडळ नेते पदावरून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दूर केले तेव्हा सर्व बंडखोर आमदार सुरत, गोहावटी येथे होते आणि तेव्हाच भरत गोगावले यांना एकनाथ शिंदे यांनी पक्षाचे प्रतोद केले हा प्रकार महाराष्ट्रच्या बाहेर म्हणजे गोहावटी येथे झाला.

2019 च्या मंत्रिमंडळात शिंदे कॅबिनेट मंत्री होते, असा युक्तिवादही यावेळी कपिल सिब्बल यांनी केला आहे. या ज्या काही गोष्टी घडल्या आहेत, त्या लोकशाहीवर आघात आहेत, या गोष्टी दहाव्या सूचीअनुसार घडल्या नाहीत, असाही युक्तिवाद यावेळी कपिल सिबंबल यांनी केला आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *